पैसे आणि शेती विक्रीला पत्नीचा विरोध; संतापलेल्या पतीने घरातच चाकूने भोसकून केला निर्घृण खून.
भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांड्यावर थरार; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू, आरोपी पती ताब्यात भडगाव | प्रतिनिधी भडगाव : तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे रविवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार आणि शेती विकण्यास विरोध केल्याच्या संतापातून पतीने पत्नीवर धारदार चाकूने सपासप वार करून तिचा निर्घृण हत्या केली….
