💥ब्रेकिंग : विद्यापीठात भविष्यातील युद्धे आणि युद्ध पद्धती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता लेफ्टनंट जनरल बिनोद जी. खंडारे यांचे “भविष्यातील युद्धे आणि युद्ध पद्धती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील कला आणि मानवविद्या प्रशाळेतील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी उपस्थित राहणार आहेत.
लेफ्टनंट जनरल बिनोद जी. खंडारे (सेवानिवृत्त) यांनी भारतीय लष्करातील दीर्घ सेवा, नेतृत्व आणि रणनीती क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत बरिष्ठ लष्करी सल्लागार म्हणून काम केले असून संरक्षण धोरण, सायबर युद्ध, तांत्रिक नवप्रयोग आणि आधुनिक युद्धतंत्र यावरील त्यांचे सखोल अनुभव व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत.
लेफ्टनंट जनरल खंडारे यांनी आपल्या कारकिर्दीत जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य भारत आणि सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच इंडोनेशिया, फिजी यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांशी निगडित सुरक्षाविषयक कामकाजाचा अनुभव त्यांना आहे. त्यांच्या व्याख्यानातून भविष्यातील युद्धांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, सायबर हल्ले, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि भारताच्या सुरक्षेची आव्हाने या बाबींचा सखोल ऊहापोह करणार आहे. विद्यापीठाच्या अधीसभा सभागृहात होणाऱ्या या विशेष व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥ब्रेकिंग : पाकिस्तानच्या प्रसिद्ध गोलंदाजाची गोळ्या मारून हत्या, व्हिडिओ व्हायरल..
💥ब्रेकिंग : ताईंचे ठरलं ! “या” दिवशी होणार भाजपमध्ये प्रवेश, चर्चांना उधाण
💥ब्रेकिंग : अवैध सट्टेबाजी ॲप प्रकरणात प्रसिद्ध क्रिकेटपटू ईडीच्या रडारवर




