Headlines

🚨 ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील महापालिकांची निवडणूक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व महापलिका आयुक्तांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात निवडणुकीसाठीची आमची तयारी असल्याचे बहुतेक आयुक्तांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे व सचिव सुरेश काकाणी यांनी या बैठकीत मतदार याद्या अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबत विचारणा केली….

Read Full News

ब्रेकिंग : एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपद, त्यासोबत मिळणार “ही” महत्वाची खाती…

हॅलो जनता न्युज, मुंबई एकनाथ शिंदे हे महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची माहिती अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिली. शिंदेसेनेच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे. भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी दि. ५ डिसेंबरला होत असताना शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याविषयी पाच दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती….

Read Full News

रुंधाटी येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न.

रुंधाटी (ता. अमळनेर) : श्री कालभैरव जागृत देवस्थान सेवा समिती, रुंधाटी यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिमय, धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पावन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साधुसंत, भगतगण व हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्री सद्गुरू दिलीप दादा यांचे तसेच बाबा कालभैरवांचे दर्शन घेतले व पवित्र आशीर्वाद प्राप्त केले. महोत्सवादरम्यान विधीवत…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : चोपडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची भाजपची उमेदवारी जाहीर

हॅलो जनता न्यूज, चोपडा – आगामी चोपडा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने साधना नितीन चौधरी यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा व परवानगी घेऊन ही घोषणा केली. यावेळी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नेता जीवन चौधरी यांच्यासह पक्षाचे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : शाळा सोडून प्रचारात फिरणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांचे वारे सुरू असताना शिक्षण क्षेत्रात गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. काही संस्थाचालकांच्या प्रचारासाठी शाळांना कुलूप लावून शिक्षक प्रचारात रमल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळेत परीक्षा सुरू असताना शिक्षक गायब सध्या जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा…

Read Full News

न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंडवरील बंद स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करा ; युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश शेलार यांची नगर परिषदेकडे मागणी.

भडगाव : शहरातील सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय (न्यु इंग्लिश स्कूल) मैदानावरील मुख्य स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसह नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे भडगाव शहराध्यक्ष योगेश शांताराम शेलार यांनी भडगाव नगर परिषदेचे…

Read Full News
Maharashtra loksabha

Maharashtra loksabha: ज्येष्ठविधीतज्ञ उज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

हॅलो जनता (मुंबई) : भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Maharashtra loksabha) प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, ही चर्चा आता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे. १९९३ चा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा, प्रशासन ॲक्शन मोडवर….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमोल सुरेश भोई याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी मित्रांसह विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग केल्याचा प्रकार चौकशीदरम्यान उघड झाला आहे. पाचोरा तहसीलदारांनी अनुदानाच्या रकमेची वसुली सुरु केल्यानंतर हे उघड झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी भोई याला तडकाफडकी निलंबित केले आहे. असा आहे पाचोरा अनुदान घोटाळा… नैसर्गिक आपत्ती निधीच्या…

Read Full News

कवयित्री बहिणाबाई शासकीय संस्थेत नेताजी व बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न !

हॅलो जनता न्युज, जळगाव : आज, कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे गट निदेशक नितीन चौधरी आणि मुकेश पाटील यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला संस्थेतील शिल्प निदेशक महेश सूर्यवंशी, किशोर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION