Headlines

Pandharpur : बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

हॅलो जनता- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे (Pandharpur) वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक…

Read Full News

Gharkul Yojna : लाभार्थ्याला मिळाले पक्के घर, एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती भेट…

हॅलो जनता न्युज, जळगाव… धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush prasad) यांनी दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात सौ. जिजाबाई शंकर पाटील यांना घरकुल (Gharkul Yojna) देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read Full News

Kulbhushan Patil : कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट

हॅलो जनता : जळगाव  उबाठा गटाचे उपमहापौर कुलभुषण पाटील (Kulbhushan Patil) यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) छत्री व टी शर्टचे आज शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर अनावरण करण्यात आले. पक्षाचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त करत…

Read Full News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने ठोठावला दंड, काय आहे नेमका प्रकार…

हॅलो जनता न्यूज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीस लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने अनुपस्थित राहिल्याने उत्तर प्रदेशातील लखनऊ न्यायालयाने त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्यांना १४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. ते अनुपस्थित राहिल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले. इतर महत्वाच्या…

Read Full News

आम्हणा किशोर आप्पा मुळे आम्हले रामन दर्शन घडी रायन, अयोध्येला जाणाऱ्या यात्रेकरूंनी मानले आभार….

हॅलो जनता, प्रतिनिधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू हे जळगाव स्टेशनवरून अयोध्यकडे रवाना झाले. पाचोरा भडगाव मतदारसंघातून तब्बल १०० जणांना या योजनेचा लाभ मिळाला असून आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून या जळगाव रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी भडगाव आणि पाचोऱ्यावरून स्वतंत्र बस ची व्यवस्था करण्यात आली होती. जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर या भाविकांचे जल्लोषात स्वागत करण्यात…

Read Full News

Rajumama bhole : मुख्य सूत्रधार अद्याप फरार, आमदार भोळेंची पोलिसांवर कारवाईची मागणी”

हॅलो जनता, जळगाव : Rajumama bhole महापालिकेच्या गिरणा पंपिंग केंद्रातील पाइपलाइन चोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, त्याला पोलिस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश भोळे (Rajumama bhole) यांनी केला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा करत भोळे यांनी संबंधित पोलिस अधिकारी व इतर सहभागी व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली. गिरणा पंपिंग…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा ढगफुटी, शेत पाहायला गेलेल्या शेतकऱ्याचा नाल्यात वाहून मृत्यू

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (जि. जळगाव) : गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले असताना रविवारी मध्यरात्री व सोमवारी सकाळी पाचोऱ्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळे नदी-नाल्यांना अचानक पूर आला असून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, पाचोरा…

Read Full News

आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी भडगांवच्या अशुतोषकुमार पाटील यांची निवड…

भडगाव : केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा भारत युवा केंद्र या राष्ट्रीय स्तरावरील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी जळगाव जिल्ह्यातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अशुतोषकुमार पाटील यांची निवड करण्यात आली आहे. केरळ दौऱ्यासाठी जळगावातील ९ युवकांची निवड, मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव विशेष बाब म्हणजे त्यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील…

Read Full News

💥 धक्कादायक : जिल्ह्यात तब्बल ८६ बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ…

हॅलो जनता न्यूज, नाशिक : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा प्रश्न गंभीर बनला असून, गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ८६ बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली आहे. यापैकी ३२ जणांवर पोलिसांत एफआयआर दाखल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इगतपुरी शहारत ही संख्या सर्वाधिक ३६ आहे. तालुक्यातील शिरसाठे येथे सहा महिन्यांपूर्वी एक बोगस डॉक्टर आढळल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला…

Read Full News

सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगावर नियुक्ती

हॅलो जनता, जळगाव : सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले आणि आदिवासी, शेतकरी, वंचित घटकांच्या हक्कासाठी दीर्घ काळ संघर्ष करणारे सचिन धांडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्य शासनाच्या निर्णयानुसार अन्न सुरक्षा अधिकार कायदा २०१३ अंतर्गत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोग हे राज्यातील गोरगरीब, भूमिहीन, भटकंती, स्थलांतरित…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION