⁠हॅलो शेतकरी

🛑 जळगाव शेतकरी आंदोलन : ११ शेतकऱ्यांसह बच्चू कडू, उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. १७ सप्टेंबर – केळी व कापसाला योग्य भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करत आंदोलन केल्याप्रकरणी माजी मंत्री बच्चू कडू आणि माजी आमदार उन्मेष पाटील यांच्यासह ११ जणांवर जिल्हा पेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शेतकरी आंदोलन: शेतकऱ्यांची ठाम मागणी

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांची ठाम मागणी होती की, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांचे निवेदन घ्यावे. मात्र, जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी आले नाहीत. त्यानंतर पोलिस प्रशासनाने केवळ बच्चू कडू, उन्मेष पाटील आणि काही निवडक शेतकऱ्यांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्याची भूमिका घेतली.

जळगाव शेतकरी आंदोलन : गेट तोडून आत प्रवेश

ही भूमिका शेतकऱ्यांना न पटल्याने संतापाची लाट उसळली. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी बच्चू कडू आणि उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा अडसर न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर धडक दिली. गेट तोडून शेतकरी आत शिरले आणि यावेळी शेतकरी व पोलिसांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली.

जळगाव शेतकरी आंदोलन : पोलिसांची कारवाई

या घटनेनंतर जिल्हा पेठ पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत बच्चू कडू, उन्मेष पाटील यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे ठाम इशारा दिला आहे की, केळी आणि कापसाला योग्य भाव मिळाला नाही तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाला नव्या वळण मिळाले असून प्रशासन आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

विद्यापीठात व्यवस्थापन अध्ययन प्रशाळेतर्फे युवक जनजागृती शिबिराचे आयोजन…

🛑चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक कामगिरी, जळगाव जिल्ह्यात प्रथम…

🛑धक्कादायक : पाचोरा शहराच्या मुख्य स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, नातेवाईकांनी चारचाकी वाहनाचे लाईट लावून केला अंत्यसंस्कार…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button