Headlines

“त्या” अपक्ष उमेदवारांचा अर्ज वैध, पाचोरा भडगाव मतदार संघातील पेच सुटला….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पाचोरा तहसील कार्यालयात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान पाचोऱ्यात निवडणूक प्रशासनाच्या दारी आक्षेपांचा पाऊस पडला आणि नामसाधर्म्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले. यावरून अनेक वादंग झाले प्रत्येक उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन आपल्या तेथे स्पर्धेत उमेदवारांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले….

Read Full News

संतप्त जमावाची जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

हॅलो जनता, जामनेर – सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तसेच तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवत गावा शेजारीच असलेल्या शेतात नेत तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिचखेडे बुद्रुक गावाजवळ दि. ११ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटना घडल्यापासून संशयित आरोपी सुभाष उमाजी भील (वय…

Read Full News

🚨 जळगाव ब्रेकिंग : शासकीय विश्रामगृहात युतीची बैठक, ठाकरेंच्या सेनेची आचारसंहिता भंगची तक्रार…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला असतानाच शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या कथित बैठकीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. आज शासकीय विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. जळगाव : कोणतीही बैठक झाली नाही…

Read Full News
Jalgaon BJP

Jalgaon BJP : भा.ज.पा. सदस्य नोंदणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

हॅलो जनता न्युज, जळगाव आज, सद्गुरु नगर येथील तृप्ती कॉर्नरवर भाजपा (Jalgaon BJP) सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनात आणि नेतृत्वात अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नरेंद्र मोदी, खासदार स्मिताताई वाघ, तसेच जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार…

Read Full News

Jalgaon : जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

हॅलो जनता प्रतिनिधी – (Jalgaon) भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांच्या मालकीचा गट क्रमांक 197/2/2 आहे. त्याच्या सर्व परवानग्या घेऊन त्यांनी जमिनीचा हिसा मंजूर केला आहे. मात्र शिंदेच्या सेनेचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व बाबींना स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात माधुरी अत्तरदे…

Read Full News

मुख्यमंत्र्यांचे सचिव आयएएस श्रीकर परदेशी यांच्याबद्दल तुम्हाला ‘या” गोष्टी माहीत आहेत का?

हॅलो जनता न्युज, मुंबई नुकताच महायुती सरकारचा शपथ विधी सोहळा पार पडला असून यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शपथ घेतली आहे. मात्र यानंतर आता मंत्री मंडळ विस्ताराचे वेध सर्वांना लागले आहे. आधीच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव राहिलेले ज्येष्ठ…

Read Full News

Mahavikas Aghadi : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाविकास आघाडी च्या वतीने निषेध

हॅलो जनता न्युज, जळगाव Mahavikas Aghadi केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने करण्यात आला असून जळगाव शहरातील शिवसेना कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत जाऊन बाबा साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव…

Read Full News

जळगाव विधानपरिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांना भाजपची उमेदवारी.

जळगाव : विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असताना अखेर नंदकिशोर महाजन यांनी बाजी मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय वर्तुळात अनेक नावांची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी नंदकिशोर महाजन यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपकडून…

Read Full News
Jalgaon Fire incident

Jalgaon Fire incident: जळगाव स्फोटातील अन्य दोघांचाही मृत्यू, कंपनी मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

हॅलो जनता (जळगाव) – Jalgaon Fire incident शहरातील मोरया ग्लोबल केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात २२ जखमींपैकी दोन कामगारांचा गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या स्फोटातील मृतांची संख्या ४ वर गेली असून अद्यापही मृतांच्या नातेवाईकांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी कंपनीचे मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक नोमेश रायगडे यांना अटक केली आहे….

Read Full News

ब्रेकिंग: डॉ. संभाजी राजे पाटील उद्या पारोळा एरंडोल मतदारसंघातून दाखल करणार उमेदवारी अर्ज..

हॅलो जनता न्यूज, पारोळा उद्या दि. २८ रोजी एरंडोल पारोळा मतदार संघातून डॉ. संभाजी राजे पाटील हे अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करत एरंडोल येथील तहसील कार्यालयात आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. संभाजी राजे पाटील हे सामाजिक काम करत असल्याने जनतेशी त्यांची नाळ जोडली आहे….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION