⁠हॅलो संवाद

Ramdevvadi Accident: रामदेववाडी प्रकरणात अजून आरोपी असल्याचा एकनाथ खडसेंचा दावा, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी अपघात (Ramdevvadi Accident) प्रकरणात आमदार एकनाथ खडसे यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेत आरोपीचा शोध घेवून कठोर शिक्षा करावी, रामदेववाडी अपघात प्रकरणात निपक्षपणे चौकशी व्हावी, या गुन्ह्यातील अधिक आरोपी निष्पन्न करावे या गुन्ह्यात तपासात ज्या त्रुटी आहेत त्या तपासून हलगर्जीपना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा विविध मागण्यांच्या निवेदन खडसे यांनी दिले आहे.

Ramdevvadi Accident : एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले प्रश्न

– एकंदरीत सर्व प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांचा तपासात हलगर्जीपणा दिसून येतो आहे. जाणीवपूर्वक आरोपींना वाचवण्याची भूमिका पोलिसांनी घेत कुठल्यातरी राजकीय दबावाखाली तपास सुरू असल्याचं प्रथमदर्शी दिसत आहे

– रामदेववाडी अपघात प्रकरणात निपक्षपणे चौकशी व्हावी, या गुन्ह्यातील अधिक आरोपी निष्पन्न करावे या गुन्ह्यात तपासात ज्या त्रुटी आहेत त्या तपासून हलगर्जीपना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा विविध मागण्यांच्या निवेदन खडसे यांनी दिले आहे.

– मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना पत्र दिल्यानंतर कारवाई केल्याची खडसेंची माहिती

– अभिषेक कौल हा जळगावतील एका मंत्राचा पीए आहे तर दुसरा आरोपी हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचा पोरगा आहे.

– इतरही आरोपींचे मोठ्या राजकीय व्यक्तींशी संबंध असल्यामुळे राजकीय दबाव नंतर सतरा दिवस होऊन देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही

– आरोपींच्या रक्ताचे नमुने घेण्यामध्ये देखील दिरंगाई केल्यामुळे सहा तासानंतर जर ब्लड नमुने घेतले तर अमली पदार्थांचे सेवन केल्यास दिसून येत नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला बसवण्यासाठी एक प्रकारे मदत केल्याचे दिसून येतं

यात अजूनही तीन चार जण असल्याची माहिती देखील आम्ही पोलिसांना दिली आहे. यात एका मुलीचा देखील समावेश होता अशा स्वरूपाची माहिती एका जबाबदार नेत्याने मला दिली असून मी आत्ताच पोलीस अधीक्षकांची त्याचं बोलणं देखील करून दिल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

मी पोलीस अधीक्षकांना विनंती केली की, या गुन्ह्याशी संबंधित सर्वांचे सीडीआर तपासा आणि पोलीस अधीक्षकांना देखील कुणाकुणाचे फोन आले हे देखील तपासल्याची विनंती केली

– एकंदरच हे प्रकरण संशयाच्या घरात असून यातील सत्य बाहेर आले पाहिजे कारण गोरगरीब कुटुंबातील चार जण यात मृत्युमुखी पडले आहेत

पुण्याची प्रकरणात सरकार गांभीर्याने घेत असले मात्र पुण्यापेक्षाही मोठी घटना जळगावची आहे

मात्र सरकारने अजूनही हे प्रकरण गंभीर देणे घेतलेलं नाही त्यामुळे सरकारने गंभीरतेने प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon : जळगावातील रामदेववाडी अपघात प्रकरण : तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपींच्या वकीलाकडून चौथ्या आरोपीचा उल्लेख

Jalgaon : धक्कादायक ! वादळात घर कोसळून चौघे जागीच ठार तर मोठा मुलगा थोडक्यात बचावला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button