Manoj Jarange Patil : केसाला जर धक्का लागला तर… – मनोज जरांगे पाटलांचा मुंडेंना इशारा
हॅलो जनता न्युज :
(Manoj Jarange Patil) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील उर्वरित आरोपींना लवकर पकडून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आज परभणी जिल्ह्यात झालेल्या सर्वपक्षीय मोर्चात करण्यात आली. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तीव्र टीका केली.
संतोष देशमुख यांचे भाऊ, धनंजय देशमुख, जे तपासासाठी पोलिस ठाण्यात गेले होते, त्यांना धमकावले गेले होते. याची माहिती मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
त्यांनी आपल्या भाषणात म्हटले, “धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकावले गेले, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. मी कुणाचेही नाव घेऊन उगाच बोलत नाही, पण यापुढे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला किंवा धनंजय देशमुख यांच्या केसाला जर काही धक्का लागला, तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. आमचा एक भाऊ गेला आहे, हे आम्ही सहन केले आहे. पण आता देशमुख कुटुंबाला त्रास झाला, तर आम्ही एकाला सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही.”
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुढे म्हणाले, “आम्हाला माज किंवा मस्ती नाही, पण आमची मुले जर रस्त्यावर येणार असतील, तर आमच्यापुढे पर्याय उरलेला नाही. जर आरोपींना घरात लपवून ठेवत असाल, तर हे सहन करणे कसे शक्य आहे? सगळे आरोपी पुण्यात नेमके कसे सापडले? याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री आरोपींना संरक्षण देत होते. या हत्येमधील आरोपींची आणि खंडणीमध्ये पकडलेल्या आरोपींची नार्को टेस्ट होणे आवश्यक आहे. त्यांना आतापर्यंत कुणी संरक्षण दिले, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.”
Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे
Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी
Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक