⁠हॅलो संवाद

Jalgaon Fire incident: जळगाव स्फोटातील अन्य दोघांचाही मृत्यू, कंपनी मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

हॅलो जनता (जळगाव) – Jalgaon Fire incident शहरातील मोरया ग्लोबल केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात २२ जखमींपैकी दोन कामगारांचा गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या स्फोटातील मृतांची संख्या ४ वर गेली असून अद्यापही मृतांच्या नातेवाईकांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी कंपनीचे मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक नोमेश रायगडे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Jalgaon Fire Incident : अजून दोन कामगारांची प्रकृती गंभीर

मृतांमध्ये किशोर दत्तात्रय चौधरी (वय ५०, रा. रामेश्वर कॉलनी) व दीपक वामन सुवा (२५, रा. विठोबानगर) यांचा समावेश आहे. किशोर चौधरी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी २:३० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दीपक सुवा हा युवक ९० टक्के भाजला गेला होता. त्यामुळे त्याला गुरुवारी सकाळी मुंबईला हलविण्यात आले होते. मात्र, नाशिकपर्यंत गेले असता, त्याचा वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान, जखमींपैकी अजून दोन कामगारांची प्रकृती गंभीर आहे.

Jalgaon Fire Incident : अनोळखी मृतदेहांचे नमुने डीएन तपासणीसाठी मुंबईला रवाना

बुधवारी स्फोट झाल्यानंतर कंपनीत प्रशासनाला दोन अनोळखी मृतदेह आढळून आले होते. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटू न शकल्याने दोन्ही मृतदेहांचे नमुने मुंबईला डीएनए चाचणीसाठी रवाना करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात त्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदानाला सुरवात, सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह…

Jalgaon Politics : मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी, कष्टकरी यांच्याशी निष्ठा ठेवली का? उन्मेष पाटील यांचा सवाल

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button