🚨 ब्रेकिंग : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे एकावन्न लाखांचा धनादेश

मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्यासह फेडरेशनचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आणि उपाध्यक्ष रोहित निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त केला. या प्रसंगी संचालक रमेश हिंगणकर, पांडुरंग घुगे, नितीन हिवसे, बळवंतराव पाटील, अशोक हटकर, भागवत दास तसेच व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबे पाटील उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेडरेशनच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत संस्थेचे आभार मानले. त्यांनी म्हटले, “सहकार क्षेत्रातील संस्थांकडून मिळणारा हा हातभार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोठा आधार ठरेल. राज्यातील सहकार क्षेत्र सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.”
दरम्यान, फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले, “शेतकऱ्यांचे दुःख हे आपल्या समाजाचे दुःख आहे. सहकार क्षेत्रातून समाजासाठी काहीतरी करण्याची परंपरा आपण जपली पाहिजे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळावा, हीच आमची भावना आहे.”
फेडरेशनकडून देण्यात आलेली ही देणगी ही केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे राज्यातील इतर सहकारी संस्थांनाही प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : भडगाव बसस्थानकासमोर बेशिस्त पार्किंग, वाहतुकीचा खोळंबा नागरिकांचा संताप….
🚨 ब्रेकिंग : रामदेववाडी गावाजवळ पुन्हा अपघात, २१ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले…




