Suresh Dhas : संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुरेश धस यांचे घेरलेले विधान ; ‘मुन्नी’ शब्दाचा पुनरुच्चार”
हॅलो जनता न्युज, मुंबई :
Suresh Dhas : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येच्या प्रकरणात नवीन खुलासे समोर येत असून, संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या प्रकरणावर आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी देखील भाष्य केले आहे.
सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सांगितले की, जो आरोपी कमी वयाचा आहे, तो सध्या घाबरलेला असेल आणि कुठेतरी लपून बसला असेल. बाकीचे आरोपी पकडले गेले आहेत आणि जो फरार आहे, त्यालाही लवकरच पकडले जाईल. विष्णु चाटे याबाबत पोलीस तपासात मदत करतो की नाही, हे सांगता येणार नाही. आवश्यकता पडल्यास हा प्रकरण नार्को टेस्टपर्यंत नेला जाऊ शकतो, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली. त्याच वेळी, त्यांनी अजित दादा आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत सांगितले की, काही महिलांना 25 ते 50 हजार रुपये मिळाले आहेत, तसेच या प्रकरणातील तपासावर धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीचा परिणाम होऊ शकतो.
सुरेश धस यांनी त्यानंतर “मुन्नी” या शब्दाचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, मुन्नी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सदस्य आहे आणि तिचे माझ्यावर प्रेम आहे. ते पुढे म्हणाले की, आपण मुन्नीची वाट पाहूयात. आमचे प्रेम 2017 पासूनचे आहे, असा खुलासा सुरेश धस यांनी केला.
Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…