🚨 ब्रेकिंग : ॲड.अविनाश सुतार यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते सत्कार

या निवडीबद्दल माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते ॲड. अविनाश सुतार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल शिंदे, माजी गटनेते संजय वाघ, दीपक माने, शिवदास पाटील, समाधान मुळे, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, भूषण वाघ, जगदीश पाटील, भैय्या ठाकूर, योगेश पाटील, ललित सुतार, प्रवीण पाटील, आकाश लांडगे, रावजी बावचे, बंटी महाजन, अनिल पाटील, सतीश चौधरी, विनोद पाटील, टिपू देशमुख, बंटी हटकर, निलेश पाटील, चंद्रकांत चौधरी, गणेश पाटील, बंटी पाटील, संजू भोई, अनिल धना पाटील, खुशाल कुंभार, राकेश महाजन, दामू पाटील, लकी पाटील, सोमनाथ महाजन, अनिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. अविनाश सुतार हे कायदेविषयक अनुभव आणि सामाजिक कार्यातून परिचित असून, नगरपरिषदेतील प्रशासन, विकासकामे तसेच जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. त्यांच्या या नियुक्तीबद्दल नामदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी तसेच भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीमुळे पाचोरा शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….




