Loksabha Election: जळगाव व रावेर लोकसभा निवडणूकीत दोन्ही लोकसभा मतदार संघात इतके उमेदवारांचे अर्ज वैध
हॅलो जनता (जळगाव) : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी (Loksabha Election) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगाव लोकसभा मतदार संघात 04 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 20 उमेदवार वैध ठरले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात 02 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 29 उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत.
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत गुरुवार दि.25 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 24 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. तर रावेर लोकसभा मतदार संघात 31 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जाची शुक्रवार दि.26 एप्रिल, 2024 रोजी छाननी करण्यात आली. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची जळगांव लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी तर रावेर लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी छाननी केली.
Loksabha Election: जळगांव लोकसभा मतदार संघात वैध ठरलेले महत्वाचे उमेदवार
- करण बाळासाहेब पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,)
- स्मिता उदय वाघ, (भारतीय जनता पार्टी )
- युवराज भीमराव जाधव( वंचित बहुजन आघाडी)
Loksabha Election: रावेर लोकसभा मतदार संघात वैध ठरलेले महत्वाचे उमेदवार
- रक्षा निखिल खडसे,(भारतीय जनता पार्टी),
- श्रीराम दयाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार),
- संजय पंडीत ब्राम्हणे (वंचित बहुजन अघाडी),
वैध ठरलेल्या उमेदवारांना 29 एप्रिलपर्यंत आपला उमेदवारी मागे घेता येणार आहे.
Banana Farmers : केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, इकडे आड तिकडे विहीर