Loksabha Election : महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आज दाखल करणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आज मोठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत.
जळगाव लोकसभेचे (loksabha election) उमेदवार करण पवार आणि रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राम पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. जळगाव शहरातील जीएस मैदान या ठिकाणी सकाळी दहा वाजता सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.
https://youtube.com/shorts/fH8bTtdB2qs?si=heD9AFN7HRGPVcBS
सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत मोठ शक्तिप्रदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नेते रॅलीत आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून सभा संपल्यानंतर दोन्हीही उमेदवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लोकसभेचा (loksabha election) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Imtiyaz Jaleel : एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील करणार करण पवारांचा प्रचार