हॅलो राजकारणहॅलो लोकसभा

Jalgaon Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना जळगाव ग्रामीण मतदारसंघातून वाढता प्रतिसाद

हॅलो जनता (जळगाव) – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात झाली असून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिरसोली, चिंचोली, धानवड आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वच गावांमध्ये करण पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले.

शिरसोली येथे श्री गणेश व हेमाडपंथी दक्षेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजाअर्चा करून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. (Jalgaon Loksabha) यावेळी कार्यकर्त्यांनी करणदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो, अशा विविध घोषणा देऊन करणदादा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. गावात ठिकठिकाणी औक्षण करून करणदादा पवार यांचे स्वागत करण्यात आले. रॅली दरम्यान करणदादा पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधत शेतकरी, कष्टकरी जनतेला खऱ्या अर्थाने प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

चिंचोली, धानवड यासह जवळपासच्या गावांमध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली. गावातील तरुणांनी स्वयंस्फुर्तीने रॅलीत सहभागी होवून करण पाटील यांचे ठिकठिकाणी पुष्गुच्छ देवून स्वागत केले. रॅलीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनाचे तालुकाप्रमुख उमेश पाटील, युवासेना धरणगाव तालुकाप्रमुख निलेश चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Loksabha Election: जळगाव व रावेर लोकसभा निवडणूकीत दोन्ही लोकसभा मतदार संघात इतके उमेदवारांचे अर्ज वैध

Jalgaon loksabha : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंमसेवक असलेले कुटुंब भाजपात…

Imtiyaz Jaleel : एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील करणार करण पवारांचा प्रचार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button