⁠हॅलो शेतकरी

Banana Farmers : केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, इकडे आड तिकडे विहीर

हॅलो शेतकरी (जळगाव) – जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून केळी उत्पादक शेतकरी (Banana Farmers) हा अडचणीत असून ” इकडे आड तिकडे विहीर” अशी परिस्थिती झाली आहे. वाढत्या तापमानामुळे रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपड़ा आदी ठिकाणच्या केळी बागा धोक्यात आल्या आहेत. याचबरोबर दरही कमी मिळत असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

संपूर्ण जिल्हाभरात एप्रिलमध्ये सूर्य आग ओकू लागल्याने केळी बागांवर तापमानाचा विपरीत परिणाम होत आहे. दुसरीकडे ऐन केळी कापणीच्या हंगामात व्यापारी बोर्डावरील भावापेक्षा कमी भावाने मालाची मागणी करीत असल्याने केळी उत्पादकांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.

केळी है नाशवंत फळ आहे. ते केळी बागेत अथवा स्टोरेजमध्येही जास्त काळ ठेवता येत नाही. अशातच मोठ्या प्रमाणावर केळी कापणीवर आली असताना ४१ ते ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असल्याने काही काही भागात अति उष्णतेमुळे केळी

Banana Farmers : बोर्डावरील भाव मिळण्यासाठी पावले उचलावी!

केळीला शासन हमी भाव देऊ शकत नसला तरी किमान आपल्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीत काढण्यात येणारा म्हणजेच बोर्डावरील भाव तरी उत्पादकांना मिळवून द्यावा, अशी अपेक्षा केळी उत्पादक करीत आहेत. लायसन्सधारक व्यापाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशीही मागणी होत आहे.

Banana Farmers : उत्पादकांना मोठी घट सोसावी लागत आहे.

महागडे बेणे, ठिबक सिंचन, वीज बिल, मोठ्या प्रमाणात वाढलेल्य रासायनिक व जैविक खताच्या किमती तसेच मजुरीचा खर्च करूनही योग्य दन मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्य खाईत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मान टाकत असल्याने केळी उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. केळी वाचवण्यासाठी उत्पादक धडपड करीत आहेत. सध्या जो माल बागांमध्ये तयार आहे, तो व्यापाऱ्यांनी कापून न्यावा, यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MVA Jalgaon : धरणगाव तालुक्यात महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात, प्रचार रॅलींना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

Imtiyaz Jaleel : एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील करणार करण पवारांचा प्रचार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button