हॅलो सामाजिक

💥 ब्रेकिंग : जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्व. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ उपक्रम

हॅलो जनता न्यूज, गाळण (ता. पाचोरा) – पाचोरा तालुक्यातील गाळण गावातील पाटील कुटुंबियांचा अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा विष्णुनगर गाळण बुद्रुक व गाळण खुर्द येथे एक प्रेरणादायी व सामाजिक भान जागवणारा उपक्रम राबविण्यात आला. स्व. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुत्र अर्जुन पाटील, पोपट पाटील व मॉर्निंग ग्रुप चे अध्यक्ष राजू पाटील यांच्या वतीने दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आदी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण व्हावा आणि शिक्षणाच्या प्रवासात कोणतीही अडथळा राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले” या उक्तीप्रमाणे समाजसेवा ही केवळ बोलण्यापुरती न ठेवता कृतीतून प्रत्यक्षात उतरवणारे राजू पाटील यांनी समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शिक्षणाबाबत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी या स्तुत्य कार्याची प्रशंसा केली आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. शाळेच्या वतीने राजू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.हा उपक्रम भविष्यातील पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल, यात शंका नाही.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥 ब्रेकिंग : मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमके काय घडले..

💥 ब्रेकिंग : लोणावळा हादरले ! तरुणीचे अपहरण करून कारमध्ये तिघांचा अत्याचार, हात पाय बांधून केले दुष्कृत्य…

💥 ब्रेकिंग : माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button