हॅलो राजकारण

Jalgaon loksabha : ब्रेकींग न्युज: जळगाव जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सूरवात मात्र हा नवीन नियम बंधनकारक…

हॅलो जनता (जळगाव) : लोकसभा निवडणुकीच्या (Jalgaon loksabha) चौथ्या टप्प्यासाठी अधिसूचना आज जारी होणार असून त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. यात, खान्देशातील जळगाव, रावेर लोकसभा क्षेत्रांचा समावेश असणार आहे. १८ ते २५ एप्रिलदरम्यान सार्वजनिक सुटी वगळता सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे.

जळगाव मतदारसंघातील उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या तर रावेरमधील उमेदवारांना अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर अर्जाची छाननी २६ एप्रिल रोजी होणार असून २९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

अशी आहे प्रक्रिया

अधिसूचना – १८ एप्रिल

अर्ज भरण्याची मुदत २५ एप्रिल

अर्जाची छाननी २६ एप्रिल

माघारीची मुदत २९ एप्रिल

मतदान : १३ मे

मतमोजणी : ४ जून

सर्वात आधी उमेदवाराला बँकेत खाते उघडावे लागणार

निवडणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी उमेदवाराला स्वतःच्या नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या खाते उघडता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे बंधनकारक आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon loksabha: मंत्री गिरीश महाजन यांनी राजकीय सन्यास घ्यावा – माजी खासदार उन्मेष पाटील

Girish mahajan : मंत्री गिरीश महाजन यांनी प्रभू रामचंद्रांना घातले साकडे, पुन्हा….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button