⁠हॅलो संवाद

Jain sports academy : जैन स्पोर्टस् अकॅडमी चा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन याला सुवर्ण

१७ ते २० ऑक्टोबर रोजी पाॅडेंचेरी येथे होणार असलेल्या सिनीयर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड तर यश शिंदे, पुर्वा चौधरी आणि गौरी कुमावत यांना कांस्यपदक

हॅलो जनता, जळगाव : दिनांक २८ ते ३० सप्टेंबर रोजी लातुर येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. २८ जिल्ह्यातील ४०० खेळाडूंनी या स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर छत्रपती संभाजीनगर उपविजेतेपद. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचा (Jain sports academy) संघ सहभागी झाला होता. यामध्ये पुरुषांच्या ७४ किलो आतील वजन गटात पुष्पक रमेश महाजन याने सलग चौथ्यांदा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे तर ५८ किलो गटात यश शिंदे याने कांस्यपदक पटकावले. महिलांच्या ५२ किलो आतील वजन गटात पुर्वा चौधरी आणि गौरी कुमावत यांनी कांस्यपदक पटकावले. त्यांना मुख्य प्रशिक्षक जयेश बाविस्कर याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले.

यांच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच अरविंद देशपांडे, हरिभाऊ राऊत, जिवन महाजन, सुनील मोरे, निकेतन खोडके, श्रीकृष्ण चौधरी, विजय चौधरी, शुभम शेटे आदिंनी कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mukhaymantri tirth darshan yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे जाण्यासाठी ६ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक घेतले आदिशक्ती पाटणादेवीचे दर्शन….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button