हॅलो क्रीडा

India Vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना सुरू ; भारतासमोर 249 धावांचं आव्हान !

हॅलो जनता, मुंबई :

India Vs England : या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकात सर्व गडी गमवून 248 धावा केल्या, ज्यामुळे भारताला विजयासाठी 249 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. आता भारताच्या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

या सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे खेळत नाही. तर, यशस्वी जयस्वालच्या पदार्पणाचा सामना आहे, आणि त्याचं व रोहित शर्माचं सलामीला येणं हे क्रीडाप्रेमींना विशेष आकर्षित करत आहे. रोहित शर्मा मागच्या काही सामन्यात फार चांगला फॉर्म दाखवत नाही, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्मा कशी खेळी करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.

इंग्लंडच्या फलंदाजीला फिलिप साल्ट आणि बेन डकेट यांनी उत्तम सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 75 धावांची भागीदारी केली. मात्र, ही जोडी फुटल्यामुळे इंग्लंडचा डाव घसरला. फिलिप साल्ट 43 धावांवर धावचीत झाला. त्यानंतर हार्षित राणाने इंग्लंडच्या धावा थांबवल्या आणि दोन विकेट एका षटकात घेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं.

हार्षित राणाने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 53 धावा देत 3 गडी बाद केले आणि एक षटक निर्धाव टाकलं. दुसऱ्या बाजूला, रवींद्र जडेजाने आपल्या फिरकीच्या जोरावर इंग्लंडला गोंधळात टाकलं. त्याने 9 षटकात एक षटक निर्धाव टाकत 26 धावा देत 3 गडी बाद केले. मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हार्दिक पांड्याचा खेळ मात्र अद्याप शून्य राहिला. इंग्लंडकडून जोस बटलर आणि जेकोब बेथेलने अर्धशतकी खेळी केली आणि इंग्लंडला सावरलं.

India Vs England : दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग 11):
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हार्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

इंग्लंड (प्लेइंग 11):
बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Raver : शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ३ लाखांची चोरी ; गुन्हा दाखल !

जळगावमध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक ; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

PM Narendra Modi : फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबीबद्दल चर्चा कंटाळवाणी ; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button