⁠हॅलो रोजगार

Erandol : स्वातंत्र्यवीर सावरकर अपे रिक्षा युनियन, एरंडोल यांच्यातर्फे अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे आर पाटील यांना जाहीर पाठींबा.

हॅलो जनता, एरंडोल (Erandol) :

एरंडोल येथे कार्यरत असणारी “स्वातंत्रवीर सावरकर अपे रिक्षा युनियन एरंडोल” (Erandol) यांनी एरंडोल पारोळा मतदारसंघात असलेल्या बहुजन, दलित, आदिवासी आणि वंचित घटक, महिला, शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ संभाजीराजे आर पाटील हेच एकमेव लोकप्रतिनिधी असल्याचे सांगत आपल्या संघटनेतर्फे जाहीर पाठींबा देण्यात आला. सर्व पदाधिकारी यांनी डॉ संभाजीराजे आर पाटील यांची प्रचार कार्यालयात भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.

आजपर्यंत सुरु असलेल्या भ्रष्ट व्यवस्थेने योजनाचा लाभ मिळवून न दिल्याने या घटकांना आजही अडचणींचा सामना करावा लागतोय परंतु या एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा निवडणुकीत एक चांगला, उच्चशिक्षित आणि सक्षम उमेदवार म्हणून डॉ संभाजीराजे आर पाटील हेच योग्य असून सर्व स्तरातील जनतेने डॉ संभाजीराजे पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन यावेळी पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले.

सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पूर्णपणे डॉ संभाजीराजे यांना या विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य मतांनी निवडून आणतील हा विश्वास देखील देण्यात आला.
यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉ संभाजीराजे पाटील यांचा वाढता पाठिंबा बघता एरंडोल पारोळा भडगाव मतदार संघात यावेळी परिवर्तन होण्याची दाट शक्यता लोकांमधून व्यक्त होतेय.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Bhadgaon : महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील यांच्या प्रचारार्थ पूनम पाटील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर…

Gulabrao Patil : नशिराबादचा चेहरा – मोहरा बदलविणार ! – गुलाबराव पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button