⁠हॅलो क्राईम

💥 ब्रेकिंग : लोणावळा हादरले ! तरुणीचे अपहरण करून कारमध्ये तिघांचा अत्याचार, हात पाय बांधून केले दुष्कृत्य…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी | लोणावळ्यात एका २३ वर्षीय तरुणीचे २५ ते ३० वयोगटातील तीन जणांनी अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तो तरुणीच्या ओळखीतील आहे.

तरुणीच्या तक्रारीनुसार २५ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास ती लोणावळ्यातील नारायणीधाम मंदिराजवळील तुंगार्ली येथून एकटी पायी चालत जात असताना तीन अनोळखी तरुणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. तिघांनी तिचे हात बांधून धावत्या कारमध्ये तसेच कार थांबवून २६ जुलै रोजी पहाटेपर्यंत वारंवार अत्याचार करून कारबाहेर फेकून दिले.

लोणावळा अत्याचार प्रकरण : चौकशीत एकच आरोपी निष्पन्न

 

या गंभीर घटनेची दखल घेत लोणावळा शहर पोलिस व पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. तक्रारदार तरुणीने तीन अनोळखी तरुणांविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास केला. सुनील गायकवाड (३५, रा. तुंगार्ली, लोणावळा) याला अटक केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥 ब्रेकिंग : माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प…!

💥 ब्रेकिंग : जयहिंद लोकचळवळ आणि भडगाव फर्स्टचा हिरवागार उपक्रम

💥 ब्रेकिंग : भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये लेटर बॉम्ब वॉर, काय आहे प्रकार….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button