Dhananjay Munde : धनंजय मुंडे राजीनाम्याच्या चर्चेवर काय म्हणाले ?
हॅलो जनता न्युज, मुंबई :
Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागील महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणात प्राथमिक अटक झालेल्या तीन आरोपींनंतर इतर संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य संशयित, वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबर रोजी पोलिसांसमोर शरण आला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा अत्यंत जवळचा सहकारी आहे, आणि या हत्येच्या संदर्भात त्याचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढवला आहे.
विरोधकांची मागणी आहे की, नैतिकतेच्या आधारावर आणि या प्रकरणातील त्यांच्या जवळच्या कनेक्शनमुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. यावर प्रतिक्रिया देताना, धनंजय मुंडे म्हणाले, “मी आज कॅबिनेट बैठकीसाठी आलो आहे, आणि मी कोणताही राजीनामा दिलेला नाही.” ते मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पोहोचताच पत्रकारांशी संवाद साधत होते.
दरम्यान, भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी करत, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. सुरेश धस यांनी पं. वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या कनेक्शनचा मुद्दा उपस्थित केला आहे, तसेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्याचा उल्लेख केला.
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Jalgaon Fraud : जळगाव शहरातील डॉक्टराची फसवणूक ; काय आहे प्रकरण ?
Shinde Gat : शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली ; तुमच्यापेक्षा तर…