हॅलो क्राईम
Chalisgaon Crime : चाळीसगावमध्ये अज्ञात व्यक्तींचा गोळीबार आणि दगडफेक
हॅलो जनता न्युज, चाळीसगाव :
चाळीसगाव (Chalisgaon Crime) शहरात काल रात्री एक मोठा घडामोडी घडली. पोद्दार शाळेजवळ काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आणि हवेत गोळीबार देखील केला. या गंभीर घटनेची माहिती मिळताच, चाळीसगाव शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक जिवंत आणि तीन खाली पुंगळ्या जप्त केल्या, तसेच सविस्तर पंचनामा केला. तक्रारदार सारंग बेलदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chalisgaon Crime : घरात घातक हत्यारे
प्राथमिक तपासानुसार, हा गुन्हा सुमित भोसले आणि महेंद्र (बाळू) मोरे यांच्यातील पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी महेंद्र मोरे यांच्या घराची झडती घेतली, आणि त्याठिकाणी हत्यार जप्त केले. घरात एक कोयता, गुप्ती, जिवंत राऊंड्स, परशु कु-हाड आणि एक लाकडी बॅट आदी घातक हत्यारे सापडली. यावरून संकेत मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरात महेंद्र मोरे आणि सुमित भोसले यांच्या गॅग्सचे पूर्ववैमनस्य आहे. गेल्या काही महिन्यांत दोन्ही गॅगचे संघर्ष चालू होते, आणि पोलिसांसाठी ते एक गंभीर चिंता बनले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करत आहेत.
Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…