Ajit Pawar : ‘बडी मुन्नी कोण?’ ; सुरेश धस यांच्या आरोपांवर अजित पवारांचे उत्तर
हॅलो जनता न्युज, मुंबई :
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्यातील प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “खूप जणांवर आरोप झाले आहेत, पण त्या आरोपांमध्ये कोणताही तथ्य नाही. काही लोक अशा आरोपांमुळे व्याकुळ होऊन राजीनामा देतात. धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की, ‘माझा याच्याशी दुरान्वये संबंध नाही. जर तपास करायचा असेल, तर तीन एजन्सींना तपास करण्याचा अधिकार देण्यात आले आहे. आणखी तीन एजन्सींना तपासायला सांगा, त्यांना देखील योग्य त्या पद्धतीने तपासायला सांगा.’ जेव्हा कोणतीही व्यक्ती असं सांगते, तेव्हा त्याच्या कामामुळे दोषी नसलेल्या व्यक्तींवर अन्याय होऊ नये. अजित पवार पुढे म्हणाले, ‘दोषी असला तरीही, जर अजित पवार दोषी ठरले तरी त्यांच्यावर देखील कारवाई होईल.'”
अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारच्या पोलीस सुविधांवरदेखील भाष्य केलं. “सरकार पोलीसांना उत्तम सुविधा देत आहे, त्यानंतरही कायदा-सुव्यवस्था का विस्कळित होईल? या अपयशाचं कारण शहराच्या पोलीस प्रमुखांच्या कामकाजावर आहे. तुम्हाला जमत नसेल तर त्याबद्दल थोडं सांगावं. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.” असं ते म्हणाले.
सुरेश धस यांच्या आरोपांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “सुरेश धस यांनी पुरावे दिले पाहिजेत. आरोप करताना विचार करावा. आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. कुणालाही पाठीशी घालणार नाही. ‘बडी मुन्नी कोण?’ यासारख्या फालतू गोष्टींवर मी बोलणार नाही. इथून पुढे मी नाव घेऊनच बोलेन.” त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर देखील भाष्य केलं. “पालकमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती
Chalisgaon Crime : चाळीसगावमध्ये अज्ञात व्यक्तींचा गोळीबार आणि दगडफेक