हॅलो सामाजिक

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेची जळगाव जिल्हा, शहर व युवा कार्यकारिणी जाहीर.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव 

जळगाव : विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित बैठकीत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना राज्य उपाध्यक्ष भगवान भाऊ वाघ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा, जळगाव शहर तसेच युवा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

बैठक उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडली. संघटनेच्या बळकटीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करून समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्य उपाध्यक्ष भगवान भाऊ वाघ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये संजीव नारायण सूर्यवंशी (जिल्हाध्यक्ष), विजय जाधव (जिल्हा उपाध्यक्ष), प्रवीण शिरसाठ (जिल्हा सचिव), गोपाल मिस्तरी (जिल्हा कार्याध्यक्ष), संजय भालेराव (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), समाधान मेतकर (जिल्हा संपर्क प्रमुख), प्रशांत रावळे (शहराध्यक्ष), सुरेश जाधव (शहर सचिव), चंद्रकांत वरणे (संपर्क प्रमुख), प्रशांत जाधव (कोषाध्यक्ष), रमेश जाधव (सहसचिव), सागर जाधव (सरचिटणीस), सतीश जाधव (सदस्य), निलेश खैरनार (युवा अध्यक्ष), राकेश गणुरकर (युवा उपाध्यक्ष), योगेश रुले (युवा संपर्क प्रमुख), हर्षल दांडेकर (युवा सरचिटणीस), सचिन सूर्यवंशी (युवा कोषाध्यक्ष), महेंद्र शिरसाठ (युवा कार्याध्यक्ष) आणि कल्पेश खैरनार (युवा सोशल मीडिया प्रमुख) यांचा समावेश आहे.

बैठकीचा समारोप समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button