Loksabha Election : निवडणूक कामात दांडी; ३० कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
हॅलो जनता (जळगांव) – निवडणुकीच्या कामाला दांडी मारत कामात कुचराई करणाऱ्या ३० कर्मचाऱ्यांवर धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात साहित्य घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. साहित्य घेऊन कर्मचारी आणि अधिकारी रवाना झाले होते.
मात्र, यांपैकी काहीजण प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहोचलेच नाहीत. गैरहजर राहण्याबाबत त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे याबाबत जळगाव ग्रामीणचे नायब तहसीलदार दिगंबर भिकन जाधव यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार धरणगाव पोलीस स्थानकात या कर्मचाऱ्यंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Loksabha Election : या कर्मचाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याची चर्चा
लोकसभेची निवडणूक देशातील सर्वात मोठी निवडणुक मानली जाते. सर्वत्र उत्सव म्हणून ही निवडणूक साजरी केली जाते मात्र 30 मुजोर कर्मचाऱ्यांनी साहित्य घेवून चक्क मतदान केंद्रावर न जाता दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये इतकी मुजोरी आली कुठून अशी जनतेत चर्चा असून राजकीय पाठबळ असल्याशिवाय हा प्रकार घडणार नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे.
Jalgaon : दांडेकर नगर, पिंप्राळा येथे १५ ते २२ मे श्री शिवमहापुराण संगितमय कथेचे आयोजन