Headlines

🚨 ब्रेकिंग: गाळण गावात झालेल्या विकास कामात कोणताही भ्रष्ट्राचार नाही, प्रत्यक्ष कामे दाखविण्यास तयार – सरपंच राजेंद्र सावंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील सुज्ञ नागरिकांनी जळगाव जिल्हा परिषद यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकासकामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, ‘मेरी ग्रामपंचायत’ अ‍ॅपवरील माहितीची पडताळणी केली असता अनेक कामांची लोकेशन गावात दर्शवली जात नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. काही कामे प्रत्यक्षात गावात झालेलीच नसून ती कुठेही दिसून येत नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणासंदर्भात ‘हॅलो जनता न्यूज’ने बातमी प्रकाशित केल्यानंतर गाळण गावचे सरपंच राजेंद्र सावंत यांनी संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सरपंच सावंत म्हणाले की, “गावात मी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून जवळपास ६० लाख रुपयांची विकासकामे केली आहेत. यात विविध दुरुस्तीची कामे, गावात दिव्यांची व्यवस्था यासह अनेक कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे प्रत्यक्षात झालेली असून गावाच्या विकासासाठीच ती करण्यात आली आहेत. ज्या कुणालाही या कामांबाबत आक्षेप असेल, त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी. आम्ही सर्व कामे दाखविण्यास तयार आहोत.” तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून सत्यस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी वाढत असून आता पुढे नेमकं काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या….

🚨 ब्रेकिंग: गाळण ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्ट्राचार, गावकऱ्यांची तक्रार… अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

जेईई मेन्समध्ये यश संजय सोनार यांचे घवघवीत यश

महिंदळे येथील काळीची वस्ती शाळेचे चारही विद्यार्थी घेता आहेत गोठ्याचे शिक्षण.

3,727Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION