हॅलो सामाजिक

आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी भडगांवच्या अशुतोषकुमार पाटील यांची निवड…

भडगाव : केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा भारत युवा केंद्र या राष्ट्रीय स्तरावरील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी जळगाव जिल्ह्यातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अशुतोषकुमार पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

केरळ दौऱ्यासाठी जळगावातील ९ युवकांची निवड, मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव

विशेष बाब म्हणजे त्यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील आणखी आठ युवकांची देखील निवड झाली असून, एकूण ९ युवकांचा गट या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. निवड झालेला हा युवकांचा समूह २२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत केरळ राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून, हा दौरा कमलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध राज्यांतील युवकांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण, राष्ट्रीय एकात्मता, नेतृत्व कौशल्य आणि सामाजिक जाणीव वाढविण्याचा उद्देश आहे. अशुतोषकुमार पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या या निवडीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुले, जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे तसेच आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर उंचावला असून, युवकांसाठी ही निवड प्रेरणादायी ठरत आहे. जिल्ह्यातील युवकांनी सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रउभारणीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा सकारात्मक संदेश या निवडीमुळे मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button