Headlines

🚨पाचोरा ब्रेकिंग : पाचोऱ्याच्या नगरध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर, यांना मिळणार उमेदवारी…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य निर्धार मेळाव्यात आज शिवसेना शिंदे गटाने नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीचा बिगुल वाजवला. या मेळाव्यात पाचोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदासाठीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून, शिंदे गटाने निवडणुकीत आघाडी घेतली आहे.

या मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवार जाहीर करण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे साहेबांशी चर्चा करून उमेदवार जाहीर करावा…

महिला राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (शिंदे गट) कडून एकच अर्ज प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी सुनीता किशोर आप्पा पाटील यांचे नाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सुनीता पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्याची मागणी केली.

यावेळी आमदार किशोर पाटील म्हणाले, “पाचोऱ्याच्या विकासासाठी आम्ही निर्धार केला आहे. पक्ष संघटना, जनतेचा विश्वास आणि शिंदे साहेबांचे मार्गदर्शन या जोरावर आम्ही ही निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकू. सुनीता पाटील या एकनिष्ठ, कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ असलेल्या महिला असून, त्या निश्चितच नगरपरिषदेच्या नेतृत्वात नवा अध्याय लिहितील.”

निर्धार मेळाव्यात ठिकठिकाणी जल्लोषाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उमेदवाराच्या समर्थनार्थ उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. या घोषणेमुळे पाचोरा तालुक्यातील राजकीय समीकरणात उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨पाचोरा ब्रेकिंग : निर्धार मेळाव्यात शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग, भाजप ठाकरे गटाला धक्का

भाजपला मोठा धक्का! निर्धार मेळाव्यात यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश होणार…

🔴 ब्रेकिंग : ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी नफा – रोहित निकम

8,295Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION