Headlines

🛑 जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, चेअरमन रोहित निकम यांच्या कामाचे कौतुक

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे चेअरमन रोहित निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला राज्यसभा खासदार पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी खासदार ॲड. निकम यांची नुकतीच राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्यपदी झालेली निवड लक्षात घेऊन सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. निकम म्हणाले, “संस्था कोणतीही असो, ती आपली मानून काम केले तर सहकार क्षेत्रात प्रगती निश्चित आहे. आपली संस्था ही कृषि औद्योगिक संस्था असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेक इन इंडिया’ आणि ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे.

चेअरमन रोहित निकम यांचे विशेष कौतुक…

या संस्थेचा मला विशेष अभिमान आहे. सहा दशकांपूर्वी लहानपणी मी माझे वडील बॅरिस्टर निकम यांच्यासोबत या सभेला हजर होत असे. आज पुन्हा या मंचावर येण्याचा आनंद आहे. चेअरमन रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली संस्था नफ्यात आहे आणि सुव्यवस्थित कारभार सुरू आहे. जिल्ह्यात यशस्वी वाटचाल करणाऱ्या आणि सतत ‘अ’ वर्ग मिळविणाऱ्या संस्था महाराष्ट्रात क्वचितच पाहायला मिळतात.”

यानंतर चेअरमन रोहित निकम यांनी वार्षिक कामकाजाचा आढावा सादर करून संस्थेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. त्यांनी विविध उपक्रमांची रूपरेषा मांडत संस्थेच्या हितासाठी सातत्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या सभेला उपाध्यक्ष अरविंद देशमुख, संचालक संजीव पाटील, रामनाथ पाटील, यादवराव पाटील, रमेश पाटील, सुधाकर पाटील, मंगेश पाटील, शांताराम सोनवणे, सोनल पवार, श्वेतांबरी निकम, अरुण देशमुख, प्रशांत चौधरी, गजानन देशमुख, विवेक पाटील, पुंडलिक पाटील, प्रताप पाटील, अरुण पाटील, निळकंठ नारखेडे तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुंडलिक पाटील यांनी केले. संस्थेचा लेखा-जोखा व्यवस्थापक श्री. पाटील यांनी सादर केला तर आभार प्रदर्शन रमेश पाटील यांनी केले.

इतर महत्वाच्या बातम्या…

केसीई सोसायटीची ८१ वर्षांची शैक्षणिक परंपरा, गौरव सोहळ्याचे भव्य आयोजन…

🛑 ब्रेकिंग : नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर हल्ला; आठ जण जखमी

जळगाव मयुरीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप…

2,683Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION