हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाचा फटका आता भारतीय भाविकांनाही बसला आहे. गुरुवारी सकाळी काठमांडूहून भारतात परत येत असलेल्या भारतीय बसवर अज्ञात हल्लेखोरांनी भीषण हल्ला चढवला. बसवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत बसच्या काचा फुटल्या तर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेश नोंदणीची असून त्यात आंध्र प्रदेशमधील भाविक प्रवास करत होते. हे भाविक प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन घेऊन भारतात परतत होते. तेव्हा काठमांडूजवळ अचानक काही आंदोलकांनी बस थांबवून दगडफेक केली. त्यानंतर प्रवाशांच्या बॅगा, रोख रक्कम, मोबाइल फोन आदी मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या. या हल्ल्यात किमान आठ भाविक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेपाळ हल्ला, भारतीय दूतावासाकडून गंभीर दखल…
भारतीय दूतावास आणि भारत सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून नेपाळ सरकारकडे कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. नेपाळमध्ये काही दिवसांपासून राजकीय घडामोडींमुळे आंदोलन सुरू असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यातच भारतीय भाविकांवरील हा हल्ला गंभीर मानला जात आहे. या घटनेनंतर भारत-नेपाळ सीमावर्ती भागातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
जळगाव मयुरीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप…
🛑 ब्रेकिंग: महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची या नेत्याकडे, राजकीय चर्चांना उधाण..
Mayuri Suicide Case | लग्नाला चार महिने अन् जळगावात विवाहितेची आत्महत्या, हुंडाबळीचा आरोप
