🛑पारोळा-भडगाव रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शेतकरी संघटना आक्रमक…

हॅलो जनता न्यूज, पारोळा प्रतिनिधी (७): पारोळा ते भडगाव या रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम सुरू असून या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती पुढे आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या गटारी बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी शेतामध्ये साचत आहे. परिणामी कापूस पिके तसेच शेडनेटमधील भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…
शेतकऱ्यांच्या मते, शासन अथवा मक्तेदाराकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट रस्त्याचा विस्तार शेतात करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती रस्त्यामध्ये गेली असून त्यांना कोणताही मोबदला मिळालेला नाही. त्याचबरोबर पिकांचे झालेले नुकसानही भरून निघालेले नाही.
शेतकरी संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा…
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी चोरवड शिवाराला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन ते तीन दिवसांत या प्रश्नावर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली.
शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी उभे राहण्याचे आश्वासन देत देवरे यांनी सांगितले की, “रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाची तयारी सुरू आहे.”
या वेळी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, मृद व जलसंधारण समितीचे तालुका अध्यक्ष एस. झेड. पाटील, पारोळा शहर युवा कार्याध्यक्ष निलेश महाजन, तसेच गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. त्यामध्ये रवींद्र साहेबराव पाटील, जगदीश साहेबराव पाटील, मोहन वसंत कुंभार, राकेश प्रकाश देसले, चंद्रकांत बापूराव पाटील, योगेश जगन पाटील, योगेश कमलाकर देसले, कैलास राजाराम महाजन, विलास सुधाकर देसले, बाळू बारकू जगताप, लोकेश जगदीश पाटील, सुरेश चिंतामण पाटील, लोटन शामराव पाटील आदी शेतकऱ्यांचा समावेश होता.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑 पाचोऱ्यात ईद मिलाद उत्साहात साजरी : महाविकास आघाडीकडून अनोखे स्वागत
🌾 शेतात सोलर पंप लावायचा आहे, लगेच करा अर्ज…
पाचोऱ्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, आमदार किशोर पाटील यांचे बाप्पाला साकडे.




