हॅलो जनता न्यूज, जळगाव – नाफडे दाम्पत्याच्या वादात संबंध नसतानाही नाव गोवून बदनामी केल्या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सीमा पांडुरंग नाफडे या महिलेविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली असून या प्रकरणी न्यायालयात दाद मागा, असे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी खडसेंना सांगितले. याआधी खडसेंनी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेटही घेतली होती.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर जळगाव दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्याकडे सीमा नाफडे या महिलेने तिचा पती रोहिणी खडसे यांचा पीए असल्याचे सांगून त्याने पैशांसाठी छळ केल्याची तक्रार केली होती. त्यानूसार तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, या प्रकरणाशी आपला काही एक संबंध नसून पाडुरंग नाफडे हा आपला पीए नसल्याचेही पत्रकार परिषद घेऊन खडसेंनी जाहीर केले होते. त्यानूसार संबंधित महिलेविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करण्याचेही त्यांनी सांगितले होते.
इतर महत्वाच्या बातम्या….
रोहित निकम यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा..
शिंदेच्या आमदाराची पुन्हा जीभ घसरली, संभाजीराजे आणि शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप
आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी
