चौकशीतील दिरंगाई चोपडा पोलिसांच्या अंगाशी, नेमका काय आहे प्रकार…

हॅलो जनता न्युज (चोपडा)
चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या संशयास्पद भरती प्रक्रियेविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई केल्याने चोपडा पोलिसांना दि. १५ मार्च रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
खोट्या स्वाक्षऱ्या, दस्तऐवज बनवून १३ शिक्षकांची पदभरती करून शासनाचा निधी लाटल्याची तक्रार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोद्दीन शेख यांनी चोपडा पोलिसांत दिली होती. त्यानुसार विद्यमान पदाधिकारी असगर अली, लियाकत अली यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधिकारी एकनाथ भिसे यांच्याकडून पारदर्शकपणे केला जात नसल्याचा आरोप करीत चिरागोद्दीन शेख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांचे न्यायपीठासमोर सुनावणी पार पडली. खंडपीठाने सुनावणीअंती चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये सेवारत असलेले पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, तपास अधिकारी एकनाथ भिसे, पोलिस हवालदार संतोष पारधी यांना दि. १५ मार्च रोजी उच्च न्यायालयात व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. भूषण महाजन कामकाज पाहत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या….
तीन दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक, रेल्वेच्या वाहतुकीवर “असा” होईल परिणाम…
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास