Headlines

Jalgaon Crime : घराबाहेर उभी असलेली रिक्षा टवाळखोरांनी पेटविली

Jalgaon Crime

हॅलो जनता न्युज, जळगाव :

जळगाव (Jalgaon Crime) शहरातील शिवाजी नगर परिसरात घराबाहेर उभी ऑटो रिक्षा अज्ञात टवाळखोरांनी पेटवून दिल्याची घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ऑटोरिक्षा चालकाने शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव (Jalgaon Crime) शहरातील शिवाजीनगर लाकूड पेठ भागात अजय राजेंद्र जगताप कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. ऑटोरिक्षा चालवून ते कुटूंबाचा उदनिर्वाह करतात, स्वतःची रिक्षा नसल्याने त्यांच्याकडे राजु गणपत चौरे यांच्या मालकीची ऑटोरिक्षा (एमएच. १९. सीडब्लू.६३४८) रात्रपाळीला चालवण्यासाठी दिली होती. अजय जगताप रात्रपाळीला रिक्षा चालवत असल्याने ते रात्री दहा नंतर जेवण करुन झोपुन गेले. मध्यरात्री त्यांच्या निघण्याची वेळ होतांना घराबाहेर उभी रिक्षा अज्ञातांनी पेटवून दिल्याने एकच गोंधळ उडाला. शेजारच्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली. मात्र, तो पर्यंत रिक्षाचे संपुर्ण नुकसान होवुन केवळ सांगाडाच शिल्लक उरला होता. अजय जगताप यांनी याप्रकरणी शहर पोलिसासंत तक्रार दिल्यावरुन अज्ञातांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक ओमप्रकाश सोनी करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

धरणगावात बंद घर फोडून चोरी, गुन्हा दाखल !

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टिका, ईडी चौकशीची मागणी

India Vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना सुरू ; भारतासमोर 249 धावांचं आव्हान !

5,142Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION