हॅलो क्राईम
Raver : शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ३ लाखांची चोरी ; गुन्हा दाखल !
हॅलो जनता न्युज, रावेर :
रावेर (Raver) तालुक्यातील खिरवड येथील एका शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३ रोजी दुपारी रावेर येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रावेर (Raver) तालुक्यातील खिरवड येथील भिका दलपत प्रजापती यांनी रावेरमधील देशमुख प्लॉटमधील आयडीबीआय बँकेतून शेती कामासाठी सुमारे ३ लाख रुपये काढले होते. ते त्यांनी बजाज कंपनीचे प्लॅटिना दुचाकीतील डिक्कीत ठेवून ते आपल्या गावाकडे निघाले. दरम्यान, गाडी पंक्चर असल्यामुळे त्यांनी रावेर ते बऱ्हाणपूर रोडवरील रुची मोटर समोरील पंक्चर दुकानाच्या समोर गाडी लावली. त्यानंतर ते पाणी पिण्यासाठी गेले, याच वेळी अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतील सुमारे ३ लाख रुपये लंपास केले. याबाबत भिका प्रजापती यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात सपोनि अंकुश जाधव करत आहेत.
chhava movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’ दिग्दर्शकांचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रभु विश्वकर्मा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात पडला पार