Jalgaon Crime : जळगावातील लॉजवर छापा अन् बांगलादेशी तरुणीचे बेकायदेशीर वास्तव्य, काय आहे नेमका प्रकार.
हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Crime
जळगावातील (Jalgaon Crime) एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांना एका तरुणीचा शोध लागला, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. तपासादरम्यान समोर आले की, ही तरुणी बांगलादेशची नागरिक आहे.
सदर तरुणीकडे भारतात येण्यासाठी लागणारे वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. या प्रकरणात हॉटेल चालक, व्यवस्थापक, आणि आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चित्रकूट येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत हॉटेल चालक, व्यवस्थापक आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.
छापेमारीदरम्यान, पोलिसांनी हॉटेलमधून एका महिलेला आणि जवळच असलेल्या हॉटेल यशमधून आणखी एका तरुणीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात निलेश राजेंद्र गुजर, चेतन वसंत माळी, आणि विजय सखाराम तायडे या तिघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.
जळगाव पोलिसांनी बांगलादेशी तरुणी आणि अन्य एका महिलेला आशादीप वसतीगृहात पाठवले आहे. तपासादरम्यान समोर आले की, लॉजवर सापडलेली तरुणी बांगलादेशची राजधानी ढाका येथील रहिवासी आहे. भारतात येण्यासाठी आवश्यक असलेले वैध पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य कागदपत्रे तिच्याकडे नसल्याचे उघड झाले आहे. यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे, आणि पोलिस अधिक तपास करत आहेत.
Highway accident : कारच्या अपघातात महिला जखमी, देवदूत म्हणून मदतीला आले भाजप कार्यकर्ते…