⁠हॅलो क्राईम

Highway accident : कारच्या अपघातात महिला जखमी, देवदूत म्हणून मदतीला आले भाजप कार्यकर्ते…

हॅलो जनता, न्युज, रावेर.. Highway accident 

बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर (Highway accident) मोटरसायकल आणि कारच्या अपघातात एक महिला जखमी झाली. महामार्गावर पडलेल्या या जखमी महिलेला भाजपाचे युवामोर्चा जिल्हासरचिटणीस संदीप सावळे यांनी तत्काळ मदत केली आणि तिला रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. कालच एका अपघातात चार युवकांचा बळी गेला असताना, आजही बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर जंगली पिर नजीक रावेरकडून आहीरवाडीला जाणाऱ्या लताबाई राजू पाटील यांच्या मोटरसायकलला मागून एका कारने धडक दिली. या धडकेत लताबाई पाटील मोटरसायकलवरून खाली पडल्या.

याच वेळी रावेरकडे येत असलेले भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप सावळे यांनी ती महिला पाहून तत्काळ मदतीचा हात दिला. त्यांनी आपल्या खाजगी गाडीतून त्या महिलेला उचलून रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. लताबाई पाटील यांच्या परिवाराने संदीप सावळे यांचे देवदूताप्रमाणे मदतीसाठी आभार मानले आहेत.

महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून, अशा घटनांमध्ये मदतीसाठी तत्पर असलेल्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद आहे. संदीप सावळे यांची तत्परता आणि माणुसकीचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Rakshatai Khadse : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचा क्लस्टर विकास कार्यक्रम; जळगाव पायलट प्रकल्पासाठी निवडले – केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

Rajumama bhole : मुख्य सूत्रधार अद्याप फरार, आमदार भोळेंची पोलिसांवर कारवाईची मागणी”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button