Highway Accident : सावदा- भुसावळ महामार्गावर भीषण अपघात: तीन तरुणांचा मृत्यू तर दोन जखमी
हॅलो जनता, रावेर/सावदा : Highway Accident
सावदा-भुसावळ महामार्गावरील पिंपरूळ गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात रावेर शहरातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने रावेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शुभम सोनार (२५), मुकेश रायपूरकर (२३), आणि जयेश भोई यांचा समावेश आहे. तर गणेश भोई आणि अजून एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा प्रकार असा घडला की एमएच २० सीएस ८००२ क्रमांकाची गाडी भुसावळहून सावदा मार्गे रावेरकडे जात असताना, ती भरधाव वेगाने झाडावर आदळली. टक्कर एवढी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर रावेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला असून, भरधाव वेगाच्या गाड्या किती जीवघेण्या ठरू शकतात, याचा प्रत्यय आला आहे.
Jalgaon : मनपा भंगार चोरी प्रकरणात मोठी अपडेट, 26 डिसेंबरला सुनावणी…