हॅलो राजकारण

🚨 ब्रेकिंग : चोपडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची भाजपची उमेदवारी जाहीर

हॅलो जनता न्यूज, चोपडा – आगामी चोपडा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने साधना नितीन चौधरी यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा व परवानगी घेऊन ही घोषणा केली. यावेळी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नेता जीवन चौधरी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चोपडा नगरपालिका : उच्चशिक्षित उमेदवार – भविष्यातील नेतृत्वाचे आशास्थान

साधना चौधरी या उच्चशिक्षित असून संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. नवीन तंत्रज्ञान, डिजिटल प्रशासन, स्मार्ट सिटी संकल्पना याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन चोपड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास भाजपच्या शहर नेतृत्वातून व्यक्त करण्यात येत आहे.

चोपडा : चौधरी कुटुंबाचा समाजसेवा आणि राजकीय परंपरेचा वारसा

साधना चौधरी या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या घडणीतून आलेल्या कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील, ज्येष्ठ भाजप नेते जीवन चौधरी, गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात अग्रेसर आहेत. तीन वेळा चोपडा नगरपालिकेचे नगरसेवक, एकदा उपनगराध्यक्ष, गटनेते म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचा वसा साधना चौधरी पुढे नेत चोपड्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतील, असा पक्षाचा विश्वास आहे.

चोपडा नगरपालिका: जीवन चौधरी यांची कार्ये – चोपड्याच्या विकासाचा पाया

चोपडा शहरात काम करताना जीवन चौधरी यांनी अनेक मूलभूत प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केली. त्यातील महत्त्वपूर्ण कामांमध्ये शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना,अमरधाम विकास,मच्छी मार्केट उभारणी, कम्युनिटी हॉल, शहरभर रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, भूमिगत गटारी योजनेला मंजुरी, तसेच शहराच्या ओळखीचे प्रतीक ठरलेला तिरंगा चौक उभारणीचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे चोपड्याला एक नवी आधुनिक ओळख मिळाली असून, हीच विकासाची वाट साधना चौधरी पुढे नेतील, असा पक्षातील वरिष्ठांचा विश्वास आहे.

उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महिलांच्या नेतृत्वाला मिळालेला प्रोत्साहनाचा हा निर्णय आगामी निवडणुकीत पक्षाला नवा ऊर्जा स्रोत ठरेल, असे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले. चोपड्यातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये साधना चौधरी यांचे नाव महत्वाचे ठरणार असून, त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : जळगाव मनपा निवडणूक, शिंदेसेनेची स्वबळाची तयारी सुरू…

🚨 ब्रेकिंग : पाचोरा पोलीस ॲक्शन मोडवर, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई सुरू

🚨 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार सुचेता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button