हॅलो जनता न्यूज, भडगाव, ता. १३ ऑक्टोबर : भडगाव शहरासह तालुक्यात जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटून प्रचंड विकास करणाऱ्या आमदार किशोर पाटील यांचा भडगावात जाहीर सत्कार करण्यात आल. भडगाव तालुक्यातील खालची पेठ परिसरात सोमवारी सायंकाळी पार पडलेल्या विकासकामांच्या लोकार्पण व जाहीर सत्कार सोहळ्याला ग्रामस्थ, नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाने पेठ भागात विकास आणि श्रद्धेचा संगम घडवून आणला.
या सोहळ्यात पेठ भागातील आराध्य दैवत श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. या कामांमध्ये चक्रधर स्वामी मंदिराकडे जाणारा काँक्रीट रस्ता, विठ्ठल मंदिर सभामंडप आणि जिल्हा परिषद शाळेची नवी खोली या महत्त्वपूर्ण सुविधांचा समावेश आहे. ही सर्व कामे स्थानिक नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागण्यांना प्रतिसाद देणारी ठरली आहेत.
कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे गट) चे स्थानिक नेते, पदाधिकारी, ग्रामस्थ, तसेच युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दुर्गेश अनिल वाघ उपजिल्हा प्रमुख युवासेना यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना दुर्गेश वाघ म्हणाले, “भडगाव तालुक्यातील प्रत्येक विकासकाम हे सामान्य जनतेच्या हितासाठी आहे. आपला उद्देश म्हणजे ‘विकासाची वाट आणि श्रद्धेचा मार्ग’ एकत्र पुढे नेणे.” त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळातही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे नवे प्रकल्प राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑 ब्रेकिंग: जळगावात महिलेवर चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न; पोलिसांनी आरोपीला सोडले…
🛑 ब्रेकिंग: सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल कोल्हे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
🛑 ब्रेकिंग: भडगावात निवडणुकीआधी मोठी राजकीय हालचाल; शिंदे सेनेचा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत
