🛑 ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात ३२ जलस्रोत जैविकदृष्ट्या बाधित

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी आरोग्य विभागामार्फत ऑगस्ट २०२५ मध्ये करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील एकूण १७५५ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३२ जलस्रोत जैविकदृष्ट्या बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान, ही तपासणी आरोग्य विभागाकडून नियमितपणे केली जाते. बाधित स्त्रोतांवर तात्काळ उपाययोजना करण्यात आली असून, ग्रामपंचायतमार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुपरक्लोरिनेशनची कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर संबंधित स्त्रोतांमधील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, पुनर्तपासणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
जळगाव जलस्रोत : प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज
प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलली आहेत. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच नागरिकांना उकळून थंड केलेले पाणीच पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात की, पाणी हीच जीवनाची मूलभूत गरज असल्याने त्याची गुणवत्ता अबाधित राखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. यासाठी जिल्ह्यात नियमित तपासण्या, सुपरक्लोरिनेशनसह इतर उपाययोजना सुरू ठेवण्यात येणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑 ब्रेकिंग : जळगावात मनसे आक्रमक, दहा दिवसांत तोडगा अन्यथा…
🛑 ब्रेकिंग : जळगावात शेतकरी आक्रमक; गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश…




