🚨 एमपीएससीकडून जंबो भरती, लाख रुपये पगार अन् ही आहे शैक्षणिक अर्हता

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये गट-क संवर्गातील एकूण ९३८ पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. एमपीएससीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जाहिरात मानली जात असून, शेकडो उमेदवारांसाठी शासकीय नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीतील वेतनश्रेणी ६३,००० ते १,००,००० रुपये इतकी असणार आहे.
एमपीएससी भरती : अर्ज प्रक्रिया सुरू
अर्ज सादर करण्याची ऑनलाईन प्रक्रिया ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली असून, २७ ऑक्टोबर २०२५ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी एमपीएससी च्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज करावेत. परीक्षा शुल्क देखील ऑनलाईन भरता येणार आहे. आयोगाने या वर्षी अर्ज प्रक्रियेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रे नीट पडताळूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो, असा इशारा आयोगाने दिला आहे.
एमपीएससी भरतीचा तपशील
- उद्योग निरीक्षक ९
- तांत्रिक सहायक ४
- कर सहायक ७३
- लिपिक टंकलेखक ८५२
- एकूण ९३८
एमपीएससी भरती : 🧾 परीक्षेचे स्वरूप
ही परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे –
पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
स्वरूप: वस्तुनिष्ठ (Objective Type)
* एकूण प्रश्न: १००
* गुण: १००
* विषय: सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, मराठी, इंग्रजी, सामान्य जागरूकता
मुख्य परीक्षा (Main Exam)
पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येईल. प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका असेल. एमपीएससीच्या संकेतस्थळावर https://mpsc.gov.in परीक्षेचा संपूर्ण तपशील, अभ्यासक्रम, तसेच अर्ज प्रक्रियेची माहिती उपलब्ध आहे. अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःचा प्रोफाइल अद्ययावत ठेवावा, अशी सूचना आयोगाने दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 युवक महोत्सव २०२५ ची तयारी पूर्ण, ९ ऑक्टोंबर रोजी होणार उद्घाटन…
🛑 ब्रेकिंग : ठाण्यावरून रोहन घुगे यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली




