💥ब्रेकिंग : उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांची बदली

हॅलो जनता न्यूज, भुसावळ । भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गेल्या २६ महिन्यांपासून कार्यरत असलेले कृष्णकांत पिंगळे यांची गृहमंत्रालयाकडून बदली करण्यात आली असून त्यांची पुणे येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या उपायुक्तपदी पदोन्नती झाली आहे. भुसावळ येथे कार्यरत असताना श्री. पिंगळे यांनी पोलीस प्रशासनामध्ये नवसंजीवनी दिली. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचा उत्साह वाढवण्यासह कार्यक्षमतेतही लक्षणीय वाढ केली.
‘एम्प्लॉई ऑफ द मंथ’ या उपक्रमाद्वारे दरमहा चार ते सहा कर्मचाऱ्यांचा गौरव केला जात होता. याशिवाय, त्यांनी फुटबॉल, व्हॉलीबॉल, योगा आणि अत्याधुनिक व्यायामशाळेची सुविधा उपलब्ध करून दिली. कर्मचाऱ्यांना कायद्याचे सखोल ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी विशेष चाचण्या आयोजित केल्या, ज्यामुळे उत्तर महाराष्ट्रात हा उपक्रम एक प्रेरणादायी मॉडेल ठरला.
त्यांच्या या उपक्रमांचे कौतुक आय.जी. आणि डी.जी. स्तरावरही करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात भुसावळ विभागातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असून, नागरिकांमध्ये त्यांची एक आपुलकीची आणि विश्वासार्ह अधिकारी अशी ओळख निर्माण झाली होती. जनसंपर्कात कुशल असलेल्या श्री. पिंगळे यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले. त्यांच्या बदलीची बातमी समजताच पोलीस दलासह भुसावळकर नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याची स्तुती होत असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 धक्कादायक : जिल्ह्यात तब्बल ८६ बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ…
💥 ब्रेकिंग : रोहिणी खडसेंची ‘त्या’ महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार, न्यायालयात दाद मागणार.




