🚨 जळगाव ब्रेकिंग : प्रभाग १३ चा कायापालट करणे हे आपले पहिले ध्येय – प्रफुल्ल देवकर

प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीने आपली संपूर्ण ताकद लावली असून, उमेदवार प्रफुल्ल देवकर, नितीन सपके आणि सुरेखा तायडे यांनी प्रचाराचा दुसरा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे. घरोघरी गाठी भेटी घेतल्यानंतर आता तिघांनी कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.
कॉर्नर सभेतून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा जनतेशी संवाद, बैठकांना उस्फुर्त प्रतिसाद…
प्रभागातील विविध चौक, सोसायट्यांचे आवार आणि वस्त्यांच्या कोपऱ्यांवर आयोजित केल्या जाणाऱ्या कॉर्नर बैठका आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. मोठ्या सभांपेक्षा या छोट्या बैठकांमुळे मतदारांना उमेदवारांशी मोकळेपणाने बोलता येत आहे. प्रफुल्ल देवकर यांनी प्रभाग १३ चा कायापालट करणे हे आपले पहिले ध्येय आहे.
प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तरुणांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन केंद्र आणि उद्यानांचे सुशोभीकरण यावर आपला भर राहील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही मतदारांशी संवाद साधला.
इतर महत्वाच्या बातम्या…




