संत ज्ञानेश्वर विद्यालयाने अप्रगत मुलांसाठी उचलले हे पाऊल

हॅलो जनता न्युज :
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाने अप्रगत मुलांसाठी 60 दिवसांचा कालबद्ध उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात वाचन, लेखन आणि मूलभूत गणिताच्या तयारीवर विशेष भर दिला जात आहे. मुलांच्या मूलभूत ज्ञानाचा पाया पक्का करणे आवश्यक असल्याने, त्यासाठी सराव सत्रे आयोजित केली जात आहेत. दररोज एक तास वाचन आणि लेखनाचा सराव केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्वाध्यायासाठी देखील मार्गदर्शन करण्यात येईल.
कोव्हिडच्या काळात शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना घरात राहून ऑनलाइन शिक्षण घेण्यास भाग पडले. त्याच वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पुस्तकांच्या आधारावर काही प्रमाणात शिकता आले असले तरी, मुलांना बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे समजल्या नाहीत. अशा अप्रगत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून अप्रगत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांची यादी तयार केली जाईल. शिक्षकांच्या मुल्यमापनानुसार, मुलांना अतिरिक्त वेळ देऊन ते समजलेले नसलेले विषय शिकवले जाणार आहेत. शाळेतील सामाजिक संस्थांच्या मदतीने अप्रगत विद्यार्थ्यांची तयारी केली जाईल. प्रत्येक मुलाच्या प्रगतीचे निरंतर निरीक्षण केले जाईल आणि महिन्याच्या शेवटी मुलांची प्रगती शाळेच्या स्तरावर मूल्यमापन केली जाईल. पालकांच्या सक्रिय सहकार्याने, शिक्षक अप्रगत मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. या उपक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले आहे.
chhava movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’ दिग्दर्शकांचा महत्त्वपूर्ण निर्णय