भाजपचे तालुका प्रमुख करणार बंडखोरी, “या” दिवशी अमोल शिंदे भरणार उमेदवारी अर्ज
हॅलो जनता न्यूज, पाचोरा –
पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली असून विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून अत्यंत कमी मताने पराभूत झालेले अमोल शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षापासून न थांबता सतत मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात उभे राहत आपला जनसंपर्क अजून जोमाने वाढवला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेले आशीर्वाद, प्रेम आणि दाखविलेला विश्वासावर अमोल शिंदे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 75 हजार मते मिळाली होती. यावेळी देखील जनतेतून मिळणारा प्रतिसाद बघता आणि त्यांच्या भावना लक्षात घेता मी जनतेचा उमेदवार म्हणून दिनांक 28 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तरी मोठ्या संख्येने मला आशीर्वाद व पाठिंबा देण्यासाठी पाचोरा-भडगाव मतदार संघातील जनतेने उपस्थित रहावे असे अमोल शिंदे यांनी आवाहन केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
कुणी उमेदवार देत का उमेदवार ! जळगाव ग्रामीण मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सापडेना…
पाचोऱ्यातून वैशाली सुर्यवंशी याच महाविकास आघाडीच्या उमेदवार, ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारी जाहीर…
ब्रेकिंग: शिंदे सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर, जळगाव जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना डच्चू….