आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भव्य व्यापारी भवनाचे पाचोऱ्यात लोकार्पण, व्यापारी बांधवांनी मानले आभार…
हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यातील व्यापारी बांधवांना हक्काची जागा मिळावी म्हणून आमदार किशोर पाटील यांच्या संकलपनेतून पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर पाचोरा नगर परिषदेअंतर्गत कृषीरत्न माजी आमदार कै. तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी भवनाचे लोकार्पण आज पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन पूनमचंद मोर यांच्या हस्ते करण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील व्यापारी बांधवांना त्यांच्या हक्काची जागा मिळाली असून या ठिकाणी एकत्र येवून तालुक्याच्या भरभराटीसाठी आणि अधिक उद्योग धंदे वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, नव युवकांना देखील मार्गदर्शन करावे म्हणजे त्यांच्यासाठी देखील रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली आहे.
५ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त भव्य अशा व्यापारी भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा चे सभापती गणेश पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मंगेश देवरे पाचोऱ्यातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी बांधव, सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
इतर महत्वाच्या बातम्या..
जामनेर मध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक करत गुन्हा दखल….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच पत्रकारांना न्याय मिळेल – आमदार किशोर पाटील
ब्रेकिंग : नेपाळ अपघातातील मयत यात्रेकरूंचे मृतदेह घेवून अँब्युलन्स भुसावळ कडे रवाना ….