Vegetable Rates : सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी; आवक घटल्याने भाजीपाल्याच्या भावात २० ते २५ टक्क्यांची वाढ
हॅलो जनता (जळगाव) जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून दिवसा वाढलेले तापमान व रात्री ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पाऊस अशा या बदलत्या वातावरणाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाल्याची पाहायला मिळत आहे. बदलत्या वातावरणामुळे भाजीपाल्याची आवक देखील घटली असून आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात (Vegetable Rates) २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असून भेंडी, टोमॅटो, गवार, पत्ताकोबी, मिरची, शेवगा, बटाट्याचे भाव ३५ ते ४० रुपयांवर गेले आहेत. तर पालक मेथी ४० रुपये जुडी तर कोथिंबीर ८० रुपये जुडी असे भाव बाजारात पाहायला मिळत आहे.
अचानक भाजीपाल्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
यावर्षी पाऊस कमी झाल्याने जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. तसेच यावर्षी रब्बी हंगामात पाण्याची कमतरता असल्यामुळे कुठेतरी भाजीपाला लागवडीत घट झाली होती आणि त्याचाच परिणाम हा मे महिन्यात भाजीपाला मार्केट वर पाहायला मिळत आहे. अचानक आवक त्याने भाजीपालाच्या दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मोठी बातमी : जळगाव-पुणे विमानसेवा (Jalgaon Airport) होणार सुरू, २४ आणि २६ मे रोजी ट्रायल